सावरगाव येथे नाथ संजीवन समाधी महोत्सवानिमित्त कार्यक्रम
बीड, 14 मार्च (हिं.स.)।आष्टी तालुक्यातील सावरगावयेथील क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे नाथ संजीवन समाधी महोत्सवास प्रारंभ होत असून, हा महोत्सव १९ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. १६ मार्च पैठण येथे निशाण मिरवणूक होईल. १८ मार्च सकाळी ११ वाजता गडावर
सावरगाव येथे नाथ संजीवन समाधी महोत्सवानिमित्त कार्यक्रम


बीड, 14 मार्च (हिं.स.)।आष्टी तालुक्यातील सावरगावयेथील क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे नाथ संजीवन समाधी महोत्सवास प्रारंभ होत असून, हा महोत्सव १९ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. १६ मार्च पैठण येथे निशाण मिरवणूक होईल. १८ मार्च सकाळी ११ वाजता गडावर 'कावडींचे' आगमन होणार असून, दुपारी १२ वाजता महाआरती होईल. दुपारी १:३० ते दुपारी ४ पैठण, काशी आणि इतर तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र गंगाजलाने समाधीस जलाभिषेक केला जाईल.

देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी नियमावली करण्यात आली असून, मंदिर परिसरात रांगेत शिस्त पाळावी, प्लास्टिक कॅन किंवा बाटल्यांमधून पाणी आणू नये. मंदिर परिसरात स्वच्छता राखावी. १९ मार्च पहाटे ५:३० वाजता मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीची विधीवत महापूजा आणि सकाळी ६ वाजता महाआरती होऊन भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मच्छिंद्रनाथ गडावरील मुख्य मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर असून, भाविकांनी यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष, सचिव आणि ग्रामस्थ सावरगाव व शेंडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande