जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग
छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या १८ मार्चला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदेसेना अलर्ट मोडवर गेली आहे. पंचायत समिती सभापती निवडीत झालेल्या हातमिळवणीच्या राजकारणामुळे शिंद
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग


छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या १८ मार्चला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदेसेना अलर्ट मोडवर गेली आहे. पंचायत समिती सभापती निवडीत झालेल्या हातमिळवणीच्या राजकारणामुळे शिंदेसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३२ सदस्यांची गरज असताना भाजपकडे पुरस्कृतांसह २४, तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ४ सदस्य आहेत. दुसरीकडे शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि अपक्ष मिळून ३५ सदस्यांचे संख्याबळ आहे.

त्यामुळे २०१७ प्रमाणे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande