परभणी - मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी सुरू
परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। परभणी विधानसभा क्षेत्र क्र. 96 अंतर्गत मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन प्रशासनास स
परभणी - मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी सुरू


परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। परभणी विधानसभा क्षेत्र क्र. 96 अंतर्गत मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (96-परभणी विधानसभा मतदारसंघ) उदयसिंह भोसले यांनी केले.

ज्या मतदारांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी सन 2002 च्या मतदार यादीत आपले नाव शोधून संबंधित विधानसभा क्रमांक, भाग क्रमांक व अनुक्रमांक ही माहिती आपल्या परिसरातील बीएलओ (Booth Level Officer) यांच्याकडे जमा करावी. तसेच ज्या मतदारांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान आहे तसेच विवाहित महिलांनी आपल्या आई-वडील किवा आजोबा-आजी यांची नावे सन 2002 च्या मतदार यादीत शोधून संबंधित माहिती बीएलओ यांच्याकडे जमा करावी.

सन 2002 च्या मतदार यादीत नाव शोधण्यासाठी https://voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आपल्या बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जवळच्या राशन दुकानात किवा महा ई-सेवा केंद्रावर आवश्यक फॉर्म उपलब्ध असून मतदारांनी ते भरून बीएलओकडे जमा करावेत. मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. भोसल व तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (96 परभणी विधानसभा मतदारसंघ) यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande