पुणे - पथारी शुल्क कपातीचा निर्णय अभिप्रायावर ठरणार
पुणे, 14 मार्च (हिं.स.)। पुणे शहरातील पथारी व्यावसायिकांच्या शुल्कात ७५ टक्के कपात करावी, थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबवावी असा ठराव स्थायी समितीला दिला होता. त्यावर स्थायी समितीमध्ये निर्णय झालेला नसून, त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला
पुणे - पथारी शुल्क कपातीचा निर्णय अभिप्रायावर ठरणार


पुणे, 14 मार्च (हिं.स.)। पुणे शहरातील पथारी व्यावसायिकांच्या शुल्कात ७५ टक्के कपात करावी, थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबवावी असा ठराव स्थायी समितीला दिला होता. त्यावर स्थायी समितीमध्ये निर्णय झालेला नसून, त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे.

शहरातील १२ हजार १५५ पथारी व्यावसायिकांनी निर्माण केलेल्या ६४ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून कडक पाऊल उचलण्यात आले आहे. त्यातील १ हजार ८२० जणांनी २०१८ पासून शुल्क थकविले असून, त्यांची थकबाकी ही २० कोटीच्या पुढे आहे.जर ही थकबाकी ३१ मार्च पर्यंत भरली नाही तर थकबाकीदारांचा परवाना रद्द केला जाणार आहे, परवानाधारक आणि त्यांचे कुटुंबीय यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. तसेच पुढील सर्वेक्षणात परवानाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार नाही. अशी अट टाकली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande