पुणे - शिधापत्रिकांवर आता मक्याचे वाटप; 14 जिल्ह्यांत निर्णय लागू
पुणे, 14 मार्च, (हिं.स.)। राज्य सरकारने पणन विभागामार्फत हमीभावाने 14 जिल्ह्यांत मका खरेदी केला आहे. हा मका आता शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेबुवारीअखेर खरेदी करण्यात आलेला मका वितरित करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दि
पुणे - शिधापत्रिकांवर आता मक्याचे वाटप; 14 जिल्ह्यांत निर्णय लागू


पुणे, 14 मार्च, (हिं.स.)। राज्य सरकारने पणन विभागामार्फत हमीभावाने 14 जिल्ह्यांत मका खरेदी केला आहे. हा मका आता शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेबुवारीअखेर खरेदी करण्यात आलेला मका वितरित करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. गव्हाच्या बदल्यात मका देण्यात येणार असून, प्राधान्य योजनेत प्रतिमाणसी मिळणाऱ्या धान्यात आता 2 किलो गव्हासोबत 1 किलो मका देण्यात येणार आहे, तर अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला 11 किलो गव्हासोबत 11 किलो मका देण्यात येणार आहे.

राज्य सरकार पणन विभागामार्फत हमीभावाने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करीत आहे. हा मका प्रतिक्विंटल 2400 रुपये या दराने खरेदी केला जात आहे. राज्यात ही खरेदी 14 जिल्ह्यांमध्ये होत आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, बुलडाणा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात 9 मार्चपर्यंत 5 लाख 13 हजार 682 क्विंटल खरेदी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande