
नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।
:- गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात उद्धव सेनेने शालिमार चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय येथे चूल पेटवून अनोखे आंदोलन केले.
हे आंदोलन सायंकाळी करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला. नागरिकांचे लक्ष वेधून घेत लाकडे जाळून चूल पेटविण्यात आली. त्यावर पाणी तापविण्यात आले. या अनोख्या आंदोलनात शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.आंदोलनस्थळी रिकामे सिलिंडर ठेवण्यात आले होते. सामान्यांना सिलिंडर भरणे अवघड झाले असून चुलीशिवाय पर्याय नाही, तेव्हा सरकारने सिलिंडरच्या किमतीत सुधारणा
करावी, अशी हाक देण्यात आली. आंदोलन युवा सेना जिल्हाप्रमुख सागर कोंकणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. जिल्हासचिव आकाश उगले, प्रवीण चव्हाण, पदाधिकारी रितेश साळवे, रोहन तांबे, मयुरेश कोथमिरे, नंदेश ढोले आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV