
लातूर, 14 मार्च (हिं.स.)।
देशाचे उज्वल भविष्य घडविण्याचे काम शाळेतूनच सुरू होते. मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी प्रथम आई-वडिलांची असली तरी त्या संस्कारांना योग्य दिशा देण्याचे कार्य शाळेतील शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि समाजात चांगला नागरिक बनण्याचे धडे शाळेतून मिळतात. त्यामुळे शाळा ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांना यशाच्या मार्गावर नेणारी पवित्र संस्था असल्याचे मत सौ.शिल्पा संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर शहरातील लाॅर्ड बस्वेश्वरा प्री - प्रायमरी स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ. शितल शिंदे, ह.भ.प. उद्धव महाराज हैबतपुरे, नगरसेविका गंगाबाई कपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis