
परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। परभणी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील डी.बी.टी. पोर्टलमध्ये समाविष्ट असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनांतील लाभार्थ्यांसाठी शासन निर्णयान्वये वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यासाठी परभणी तालुक्यातील लाभार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरी भागातील लाभार्थ्यांनी दि. 17 मार्च 2026 रोजी तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी दि. 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.
या शिबिरात युडीआयडी कार्ड काढण्यासाठी स्वतः दिव्यांग लाभार्थी यांनी मूळ दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकासह उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार डॉ. संदिप राजपुरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis