बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांची होणार फेरतपासणी; विशेष समितीची स्थापना!
बीड, 14 मार्च (हिं.स.)।बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत झालेल्या गर्भाशय शस्त्रक्रियांची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष समितीची स्थापना केली आहे. २०१९ मध्ये गाजलेल्या गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल
बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांची होणार फेरतपासणी; विशेष समितीची स्थापना!


बीड, 14 मार्च (हिं.स.)।बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत झालेल्या गर्भाशय शस्त्रक्रियांची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष समितीची स्थापना केली आहे. २०१९ मध्ये गाजलेल्या गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये अनावश्यक शस्त्रक्रिया झाल्या आहेत का, याची तपासणी केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विविध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून ही समिती महिलांशी थेट संवाद साधून अहवाल सादर करणार आहे. सध्या बीडमध्ये खासगी रुग्णालयांना अशा शस्त्रक्रियेपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेणे बंधनकारक असून या नियमाच्या अंमलबजावणीवरही समिती लक्ष ठेवणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande