रत्नागिरी : चिपळूणमधील पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी १.१४ कोटीचा निधी मंजूर
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : चिपळूणच्या पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी १ कोटी १४ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी हा निधी मंजूर
रत्नागिरी : चिपळूणमधील पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी १.१४ कोटीचा निधी मंजूर


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : चिपळूणच्या पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी १ कोटी १४ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गेली अनेक वर्षे पडून असलेल्या इमारतीचे सुशोभीकरण होणार आहे. मैदानाचा सर्वांगीण विकास करताना कॉमेन्ट्री बॉक्स तसेच इनडोअर स्टेडियमचे बांधकामही करण्यात येणार आहे. त्यामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव आणि स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे.

आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळणार असल्याची भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande