रत्नागिरीत रविवारी पोलीस भरतीच्या ११०३ उमेदवारांची लेखी परीक्षा
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठीची बहुप्रतीक्षित लेखी परीक्षा येत्या रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीत यशस्वी ठरलेले उमेदवार आता लेखी परीक्षेसाठी सज्ज
रत्नागिरीत रविवारी पोलीस भरतीच्या ११०३ उमेदवारांची लेखी परीक्षा


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठीची बहुप्रतीक्षित लेखी परीक्षा येत्या रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीत यशस्वी ठरलेले उमेदवार आता लेखी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत.

प्रशासनाने ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शहरातील दोन मुख्य केंद्रांची निवड केली आहे. मिरजोळे एमआयडीसी (शहराच्या जवळ), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय श्री शामराव पेजे भवन, थिबा पॅलेस परिसर या ठिकाणी परीक्षा होणार आहे.

शारीरिक चाचणीच्या कठीण प्रक्रियेनंतर एकूण ११०३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये एकूण पुरुष उमेदवार ७८६ तर महिला उमेदवार ३१७ आहेत.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे. या परीक्षेमुळे पोलीस दलातील भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार असून, प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande