रत्नागिरीत १२५ एनसीसी कॅडेट्सनी दिली एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षा
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : येथील महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीच्या वतीने आयोजित एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षा येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेसाठी कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील एकूण १२५ एनसीसी
रत्नागिरीत १२५ एनसीसी कॅडेट्सनी दिली एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षा


रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : येथील महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीच्या वतीने आयोजित एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षा येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेसाठी कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील एकूण १२५ एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कोल्हापूर ग्रुप हेडक्वार्टरचे ट्रेनिंग अधिकारी लेफ्टनंट कर्नल धनंजय देसाई आणि ३ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी-पुणे येथील नौसेना अधिकारी कॅप्टन ऋषिकेश यांनी निरीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

यावेळी महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये लेफ्टनंट कमांडर दिलीप सरदेसाई, मेजर सीमा कदम, सेकंड अधिकारी निशिता पिलणकर आणि एनसीसी केअर अधिकारी निधी भाडवलकर या चार एनसीसी अधिकाऱ्यांसह ७ नौसेना अधिकारी स्टाफ, नौका प्रतिमान निर्देशक आणि सिव्हिल स्टाफचा समावेश होता. लेखी परीक्षेसोबतच कॅडेट्सची प्रॅक्टिकल टेस्टही घेण्यात आली.

एनसीसीच्या या महत्त्वाच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार असून, यशस्वी परीक्षार्थींना पुढील करिअरमध्ये या प्रमाणपत्राचा मोठा फायदा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande