परळी लोकन्यायालयात 86 प्रकरणे तडजोडीने निकाली
बीड, 15 मार्च (हिं.स.)। परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण इत्यादी संस्था यांची 86 प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. या लोक अदालतीत दाखल पूर
अ


बीड, 15 मार्च (हिं.स.)। परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण इत्यादी संस्था यांची 86 प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली.

या लोक अदालतीत दाखल पूर्व 24 व प्रलंबित प्रकरणे 62 मिळून 86 प्रकरणे निकाली निघाली आणि एकूण रक्कम वसुली 68 लाख 85 हजार 284 रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या डि आर बोर्डे न्या डि वाय रायरीकर ॲड व्हि डी धुमाळ ॲड व्हि एम जगतकर यांनी काम पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड डि बी कडबाने; ॲड आर.व्हि.गित्ते; अँड प्रदिप गिराम; ॲड आर व्हि देशमुख; ॲड मिर्झा मंजुर अली; ॲड.माधवराव मुंडे; ॲड वैजनाथ नागरगोजे; ॲड दिलीप स्वामी; ॲड प्रभाकर सातभाई; सहाय्यक अधीक्षक गिरीधर जोशी; बँकेचे वसुली अधिकारी राहुल गोपणपाळे रघुनाथ यांच्यासह आदींनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande