नांदेड-अण्णाभाऊ साठे चौक ते खालसापर्यंत उड्डाणपूल होणार
नांदेड, 15 मार्च (हिं.स.)नांदेड उत्तर मतदार संघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी शहराला आणखी एक अनोखी भेट दिली असून अण्णाभाऊ साठे चौक ते खालसा आयटीआयपर्यंत उड्डुणपुलाची मंजुरी करुन आणली असून निविदा प्रक्रिया होऊन लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आह
नांदेड-अण्णाभाऊ साठे चौक ते खालसापर्यंत उड्डाणपूल होणार


नांदेड, 15 मार्च (हिं.स.)नांदेड उत्तर मतदार संघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी शहराला आणखी एक अनोखी भेट दिली असून अण्णाभाऊ साठे चौक ते खालसा आयटीआयपर्यंत उड्डुणपुलाची मंजुरी करुन आणली असून निविदा प्रक्रिया होऊन लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी माजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सांगवी परिसरातील आसना ब्रीजच्या सुशोभीकरणासाठी ४० कोटी रुपये मंजुर करुन आणले होते. गुरुतागद्दी सोहळ्यानंतर शहरात एक ही मोठा रस्ता किंवा उड्डाणपुल झाले नव्हते. २००८ नंतर शहराच्या विकासासाठी ठोस काही पाऊले उचलल्या गेली नाहीत.

त्याकाळात काही नवीन पुल तयार झाले होते. आता शहरात मोठा उड्डाणपुल मागच्या २० वर्षात झाला नाही. वास्तविक मंत्रीपद नांदेड जिल्ह्याला होते. काही शैक्षणिक संस्थांचा फायदा आणि काही मोजक्या गुत्तेदारांना फायदा करुन त्यांच्या मार्फत कमाई करण्याचे अनेक धंदे झाले. उत्तर मतदार संघाचा मागील दहा वर्षांपासून विकास करण्याचा कल्याणकरांनी चंगच बांधला आहे. ग्रामीण रुग्णालयासह अनेक ठिकाणचे रस्त्यासह जनतेच्या विकासाचे कामे करण्याचे धाडसी प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यात अण्णाभाऊ साठे चौक ते खालसा आयटीआय पर्यंतच्या उड्डाणपुलाची भर पडणार आहे. सदरील उड्डाणपूल ४२ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा असणार आहे. दि. २७ मार्च २०२६ रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande