
लातूर, 15 मार्च (हिं.स.)।
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनीवारी सायंकाळी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. दारूच्या नशेत असलेल्या एका तळीरामाने चौकातच रस्ता अडवून धरत तब्बल एक तास वाहतुकीचा खोळंबा केला.
या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही तळीराम हटायला तयार नव्हता. त्यामुळे काही काळ चौकात प्रेक्षकांची गर्दीही झाली.
अखेरीस परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी पोलीस व्हॅन बोलावली. पोलिसांनी त्याला समज देत थेट घरपोच सोडण्याची वेळ आली...
दरम्यान, चौकात घडलेल्या या ‘तळीराम नाट्या’ची चर्चा शहरात रंगली असून “वाहतूक सांभाळणाऱ्या पोलिसांनाच एका माणसाने तासभर गुंतवून ठेवले,” अशी मिश्कील प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis