इफ्तार पार्टी म्हणजे एकतेचा संदेश : माजी मंत्री संजय बनसोडे
लातूर, 15 मार्च (हिं.स.)। समाजातील एकोपा वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन समाज बांधवांकडुन करण्यात येते. या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडुन रोजा धरुन ३० दिवस कडक उपवास केले जातात. प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे आपुलकी , जिव्हाळा आ
संजय बनसोडे


लातूर, 15 मार्च (हिं.स.)।

समाजातील एकोपा वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन समाज बांधवांकडुन करण्यात येते. या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडुन रोजा धरुन ३० दिवस कडक उपवास केले जातात. प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे आपुलकी , जिव्हाळा आहे. आपण कोणाची निंदा करायची नाही कोणाची निंदा ऐकायची नाही वाईट कुणाचे करायचे नाही. हे पावित्र फक्त रोजच्या महिन्यात आहे.

माणुसकी धर्माची शिकवण देणाऱ्या उच्च प्रतीच्या मानवी सद्गगुण्यांना चालना देणाऱ्या या पवित्र रमजान महिन्याच्या माजी मंत्री संजय बनसोडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नमाज पठणाने करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन इफ्तार केला. या प्रसंगी आपसी सलोखा, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

आयोजकांनी सांगितले की, रमजान महिना हा संयम, सेवा आणि बंधुभाव वाढविण्याचा काळ आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन इफ्तार पार्टी साजरा करतात हे उदगीर शहराचे वैशिष्टय आहे.

पवित्र रमजान महिन्यानिमित्त

मकबरे नवाबान मस्जिदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमिया यांच्या वतीने ही इफ्तार पार्टी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आ.संजय बनसोडे उपस्थित बांधवांना संबोधित करत होते.

यावेळी मौलाना अजीजुर्रहमान, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, नगरसेवक सचिन हुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलंवडे, तहसीलदार राम बोरगावकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande