लातूर - संसदेच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपचे गांधी चौकात तीव्र आंदोलन
लातूर, 15 मार्च, (हिं.स.)। देशाच्या संसदेचा अवमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज गांधी चौक येथे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. संसदेच्या अर्थ
आंदोलन


लातूर, 15 मार्च, (हिं.स.)। देशाच्या संसदेचा अवमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज गांधी चौक येथे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान १२ मार्च २०२६ रोजी संसद भवनाच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चहापार्टी आयोजित केली. या कृतीमुळे देशाच्या संसदेसह जनतेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

यावेळी उपस्थितांनी संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे, अशी भूमिका मांडली. संसदेला ‘पिकनिक स्पॉट’ बनवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न निंदनीय असून तो लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या निदर्शनावेळी मनपा गटनेते दीपक मठपती, जिल्हा सरचिटणीस संजय गीर, रागिणी यादव, नगरसेवक रविशंकर जाधव, स्वाती घोरपडे, करुणा शिंदे, अनंत गायकवाड, उद्धव तेलंगे, ऋषिकेश राजे, विनय जाकते, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडे, एससी मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, महिला मोर्चा अध्यक्ष शीतल मालू, युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष मुन्ना हाश्मी, मंडल अध्यक्ष राहुल भुतडा, सुरेश जाधव, निर्मला कांबळे, राजेश पवार, शिवकुमार बिराजदार, धनंजय हाके, सुरेश राठोड, देवा गडदे, महादेव कानगुले, बाबा गायकवाड, विजय अवचारे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गजानन गंभीरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande