बीड जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न
बीड, 15 मार्च (हिं.स.)बीड जिल्हा महसूल विभागाच्या वतीने आयोजित बीड जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या स्प
बीड जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न


बीड, 15 मार्च (हिं.स.)बीड जिल्हा महसूल विभागाच्या वतीने आयोजित बीड जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या स्पर्धांच्या माध्यमातून महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये एकोप्याची भावना, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धेची जाणीव अधिक दृढ होणार आहे. दैनंदिन शासकीय कामकाजाच्या धकाधकीतून थोडा विरंगुळा मिळत असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परस्पर संवाद आणि सहकार्याची भावना अधिक बळकट होत आहे.

मान्यवरांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या संघांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला असून पुढील काही दिवस विविध क्रीडा प्रकार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व सहभागी संघांना शुभेच्छा देत स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande