बीड : ममदापूरमध्ये ऊसाच्या फडात वारकऱ्याचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
बीड, 15 मार्च (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात एका ६० वर्षीय वारकरी वृद्धाचा ऊसाच्या शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून क्षयरोगाशी झुंज देत होते. या गंभीर आजारामुळे आ
बीड : ममदापूरमध्ये ऊसाच्या फडात वारकऱ्याचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह


बीड, 15 मार्च (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात एका ६० वर्षीय वारकरी वृद्धाचा ऊसाच्या शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून क्षयरोगाशी झुंज देत होते. या गंभीर आजारामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी स्वतःला पेटवून घेत जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एम.ए. पर्यंत शिक्षण झालेले आणि वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असलेल्या आठ दिवसांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे ममदापूर गावावर शोककळा पसरली असून प्रशासकीय दिरंगाईमुळे ऊस वेळेवर न तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप शेतकरी यांनी केला आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. उच्चशिक्षित आणि धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या अशा अंतामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande