
पुणे, 15 मार्च (हिं.स.)। डिजिटल साधनांचा वापर करताना सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे,असे मत सायबर तज्ञ् डॉ.रोहन न्यायाधीश यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुनाजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अँड रिसर्च अर्थात आयबीएमआर यांच्यावतीने वाकड येथील शैक्षणिक संकुलात आयोजित सायबर सुरक्षा विषया वरील कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, समाज माध्यमांचा वापर करताना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये,तसेच कायम सजग राहून कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगत मोबाईलचा वापर करताना गरजेपुरत्या ऍप्सचाच वापर करावा आणि सायबर गुन्हा घडल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्कसाधावा असे ही न्यायाधीश यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु