
नांदेड, 15 मार्च (हिं.स.)।
राज्य व नांदेड केंद्र महापालिकेचा संयुक्त अमृत २.० योजनेतून गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी १७ पैकी १४ नाल्यांचे घाण पाणी वळविण्यात आले आहे. केवळ ३ नाले जोडण्याचे काम औपचारिकरित्या शिल्लक आहे. १ मे महाराष्ट्रदिनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होणार आहे. पवित्र गोदावरी नदी ही भावनिकरित्याही शुध्द होणार आहे.
केंद्राचा ३६.३३, राज्य सरकार ३३.३३ व महापालिकेचा ३० टक्के वाट्यातून जवळपास २४ कोटी रुपयांच्या निधीतून गोदावरी नदी प्रदूषणमुक्त प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरातील वाहून नेणारे घाण पाणी हे १७ नाल्यांद्वारे पूर्वी गोदावरी
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आमचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे १०० दिवसांच्या कार्यक्रमात गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्या दिशेने आढावा घेण्यात येत आहे.
केंद्र-राज्य सरकार व महापालिका यांचा संयुक्त अमृत २.० योजनेतून गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने वेळोवेळी त्याचा आढावा घेतला असून जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच १०० टक्के गोदावरी नदी प्रदूषणमुक्त दिसेल.
गोवर्धनघाटकडून
शहराच्या जुन्या नांदेड भागातून
हबीब नाल्याद्वारे घाण पाणी गोदावरी नदीत येते, त्या नाल्याचे पाणी वळविण्यासाठी जागेचा वाद निर्माण झाला आहे. बंदाघाट येथे २ एमएलडी क्षमतेचे मलनिःस्सारण केंद्रात ते पाणी शुध्द करून गोदावरी नदीत सोडल्या जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis