
परभणी, 15 मार्च (हिं.स.)।
आयुर्वेद व्यासपीठ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त परभणी येथील निरामय योग केंद्र येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. दिपाली देशमुख यांनी “महिलांचे मानसिक आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, कुटुंब व कामाचा समतोल राखताना महिलांनी मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अँड. मंजुषा बागल यांनी सायबर क्राईम या विषयावर महिलांना मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना आणि सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद पत्की होते. यावेळी उपाध्यक्ष विद्या भालेराव, सचिव गुरुदत्त चौधरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis