महाराष्ट्र नरेडकोच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे जयेश ठक्कर
नाशिक, 15 मार्च (हिं.स.)। नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ उद्योजक जयेश ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या नरेडको महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसा
Jayesh Thakkar from Nashik


नाशिक, 15 मार्च (हिं.स.)। नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ उद्योजक जयेश ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या नरेडको महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. नरेडको महाराष्ट्रचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी ठक्कर यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राचा आवाज आता राज्य स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रश्नांना मिळणार वाचा आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना जयेश ठक्कर यांनी विश्वास व्यक्त केला की, नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न राज्य स्तरावर मांडून ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला नव्या जोमाने चालना देणे आणि व्यवसायातील अडचणी दूर करणे ही आपली प्राथमिकता असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नूतन कार्यकारिणी जाहीर

या सभेत अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्याः उपाध्यक्षः राजेंद्र पाटे (पुणे), घनश्याम ढोकणे (नागपूर). संयुक्त सचिवः पंकज कोठारी (अकोला), अरविंद खबाळे (कराड) आणि दिनेश दोषी (रायगड). नरेडको महाराष्ट्रचे नूतन अध्यक्ष कमलेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन टीम आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक आगामी काळात अधिक ऊर्जेने काम करतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. जयेश ठक्कर यांच्या निवडीबद्दल नरेडको नाशिकच्या वतीने आणि शहरातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande