गेवराई विधानसभा मतदारसंघातील महावितरणशी संबंधित समस्यांबाबत आढावा बैठक संपन्न
बीड, 15 मार्च (हिं.स.)। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील महावितरणशी संबंधित समस्यांबाबत आढावा घेतला. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत विविध विषया
अ


बीड, 15 मार्च (हिं.स.)। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील महावितरणशी संबंधित समस्यांबाबत आढावा घेतला. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

सुधारित वितरण क्षेत्र योजना - विद्युत प्रणाली बळकटीकरणांतर्गत सुमारे २४७ कोटी रुपये किमतीचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत. वीज वितरणाशी संबंधित समस्या आणि विद्युत प्रणाली बळकटीकरणासाठी आवश्यक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कार्यकारी अभियंता डोंगरे, कार्यकारी अभियंता कांबळे, उपअभियंता (गेवराई) मोरे, उपअभियंता (बीड ग्रामीण) पवार, उपअभियंता (स्थापत्य) रामटेके, सहाय्यक अभियंता इंगळे यांच्यासह महावितरणचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नवीन ३३ केव्ही उपकेंद्रे: गढी, कोळगाव, लिंबारुई (देवी) ता. बीड आणि मंगरूळ क्र. २ ता. माजलगाव येथे नवीन ३३ केव्ही उपकेंद्रांच्या बांधकामाच्या अनुषंगाने चर्चा केली.

उपकेंद्र रोहित्र क्षमतावाढ: राक्षसभुवन (शनिचे), गुळज, धोंडराई, केकतपांगरी, बेलगाव, पाडळसिंगी, उमापूर, तलवाडा, माटेगाव, माळीपारगाव ता. माजलगाव येथील विद्यमान ३३ केव्ही उपकेंद्रांतील रोहित्रांची क्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. दि. ३१ मार्चपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्देश दिले.

नवीन लिंकलाईन: मालेगाव, कुरणपिंप्री, पाथरवाला, धोंडराई, राहेरी, पाडळसिंगी, ईरगाव, बंगालीपिंपळा, तळणेवाडी, राजपिंप्री, जातेगाव, दिमाखवाडी - उक्कडपिंप्री, तालखेड - टाकरवण आदी ११ केव्ही लिंकलाईनच्या कामाबाबत चर्चा केली.

मागेल त्याला सौर कृषीपंप योजना: या योजनेत १९,९५० अर्ज दाखल असून १२,५७८ अर्ज मंजूर आहेत. यांपैकी ९,७७७ सौर कृषीपंप अस्थापित झालेले आहेत. प्रलंबित असलेले ३,८०१ सौर कृषीपंप अस्थापित करण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने चर्चा केली.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण प्रणाली बळकटीकरणासाठी आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande