बीडमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर धाड; २९ सिलेंडर जप्त, संशयित अटकेत
बीड, 15 मार्च (हिं.स.)। पेठ बीड पोलीस आणि महसूल विभागाने शिवनेरी नगर परिसरात धाडसी छापा टाकून २९ अवैध गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी ७३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोल
बीडमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर धाड; २९ सिलेंडर जप्त, संशयित अटकेत


बीड, 15 मार्च (हिं.स.)। पेठ बीड पोलीस आणि महसूल विभागाने शिवनेरी नगर परिसरात धाडसी छापा टाकून २९ अवैध गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी ७३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपीने आपल्या घरात इंडेन आणि एच.पी. कंपनीचे घरगुती व व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारासाठी विनापरवाना साठवून ठेवले होते. पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक साईनाथ बारगळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande