
छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)।
चौका, नाणीज उपपीठ, छत्रपती संभाजीनगर
येथे आयोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याच्या पावन प्रसंगी परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेण्याचा योग पालकमंत्री संजय शिरसाट यांना आला. त्यांच्या करकमलातून आशीर्वाद घेतल्याने मनाला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणा मिळाली, असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले,महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म, समाजप्रबोधन आणि सनातन संस्कृतीचे जतन यासाठी सातत्याने होत असलेले कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमुळे आणि मार्गदर्शनामुळे लाखो भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून समाजात संस्कार, सदाचार आणि सेवाभाव वृद्धिंगत होत आहे.
या पवित्र प्रसंगी महाराजांचे आशीर्वाद घेऊन समाजहित आणि जनकल्याणाच्या कार्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कृपाशीर्वादाने समाजसेवेचा हा प्रवास अधिक समर्पणाने आणि उत्साहाने पुढे नेत राहण्याची प्रार्थना यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis