
बीड, 15 मार्च (हिं.स.)मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे अवधूत सिद्ध महायोगी श्री दादा गुरू भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. लक्ष्मण सस्ते महाराज तसेच इतर महाराजांनी पायी ३६०० किलोमीटर नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांचा सन्मान आमदार सुरेश धस यांनी केला
या पवित्र नर्मदा परिक्रमेच्या पूर्तीनिमित्त पाटोदा शहरामध्ये भव्य दिव्य मिरवणूक व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अत्यंत भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या सर्व महाराजांना पूर्णपोषाख भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून महाराजांचे आशीर्वाद घेतले,ही आनंदाची बाब आहे. असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis