
बीड, 15 मार्च (हिं.स.)।गेवराईसह बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाकडे वळला आहे. घाम गाळून पिकवलेल्या या घामाला योग्य दाम मिळावा, वेळेत पैसे मिळावेत आणि कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याच भूमिकेतून गेवराई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 'कांदा मार्केट व नवीन फळे-भाजीपाला मार्केट यार्डाचा' शुभारंभ माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.
या निर्णयाचे महत्त्वाचे पैलू:थेट लिलाव: अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असून पारदर्शक पद्धतीने लिलाव होतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचा थेट फायदा होईल.
फसवणुकीला लगाम: शेतकऱ्यांच्या मालाची अचूक मोजणी आणि रास्त भाव मिळावा यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे.
भविष्यातील सोयी: लवकरच येथे 'कोल्ड स्टोरेज' आणि 'शेतकरी भवन' उभारले जाईल. ज्या माध्यमातून शेतकरी मेळावे आणि आधुनिक शेतीचे मार्गदर्शन दिले जाईल.
गेवराई तालुक्यातील आणि परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कांदा विक्रीसाठी इतरत्र न नेता बाजार समितीच्या अधिकृत लिलावात आणावा. असे आवाहन करण्यात आले
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासहेब मोटे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष गणपत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवाजीराव मोटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis