ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन
Program held at the District Collector's Office on the occasion of World Consumer Rights Day
Program held at the District


नाशिक, 15 मार्च (हिं.स.)।

, : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनीष सानप आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी सांगितले की, नागरिकांनी ऑनलाईन खरेदी करताना काळजी घ्यावी. वस्तू खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे. ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना दक्षता घ्यावी, असे सांगत त्यांनी ग्राहक जनजागृतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. . सांगळे यांनी सांगितले की, वैध मापन विभागातर्फे ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन केले जाते. ग्राहकांनीही आपले हक्क समजून घेतले पाहिजेत. वैध मापन विभागाकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande