नांदेड - राष्ट्रीय लोकअदालतीत ५ कोटी ८ लाखांचा मालमत्ता कर वसूल
नांदेड, 15 मार्च, (हिं.स.)।नांदेड महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांकडे ३१० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर थकला आहे. १५ हजार थकीत करदात्यांना राष्ट्रीय लोकअदालतीत नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. शनिवारी लोक अदालतीचे महापालिकेत आयोजन करण्यात आले होते.
नांदेड - राष्ट्रीय लोकअदालतीत ५ कोटी ८ लाखांचा मालमत्ता कर वसूल


नांदेड, 15 मार्च, (हिं.स.)।नांदेड महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांकडे ३१० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर थकला आहे. १५ हजार थकीत करदात्यांना राष्ट्रीय लोकअदालतीत नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. शनिवारी लोक अदालतीचे महापालिकेत आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये ५ कोटी ८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.

जिल्हा न्यायाधीश ब्रम्हे, विधी प्राधिकरणाचे देशपांडे, पॅनल न्यायाधीश एन. व्ही. पवार, अॅड. रंजना लांडगे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम

अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या उपस्थितीत ही लोकअदालत सुरू झाली. या लोकअदालतीमध्ये मालमत्ता थकीत करदात्यांनी ५ कोटी ८ लाखांचा कर भरला. मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सहा क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे वेगळे टेबल होते. त्याठिकाणी कर भरण्यासाठी गर्दी झाली होती.

लोक अदालत सुरू झाल्यानंतर अचानकपणे सर्व्हर दोन तास बंद पडले. त्यामुळे कर भरण्यासाठी मालमत्ताधारक निघून गेले. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी तात्काळ कंपनीशी थेट संपर्क साधून सूचना केली व सर्व्हर सुरू झाले. त्यामुळे पुन्हा मालमत्ता करदात्यांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande