व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे पुण्यातील खाऊगल्लीतही शुकशुकाट
पुणे, 15 मार्च (हिं.स.)।पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या अघोषित टंचाईचा परिणाम खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत असल्याचे दिसून येत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्टॉल आणि
gas


पुणे, 15 मार्च (हिं.स.)।पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या अघोषित टंचाईचा परिणाम खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत असल्याचे दिसून येत आहे.

गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्टॉल आणि छोटी खाद्यपदार्थांची दुकाने तात्पुरती बंद ठेवावी लागत असून, काही ठिकाणी विक्रेत्यांनी मेन्यूमधील पदार्थही कमी केले आहेत. परिणामी संध्याकाळी गजबजणाऱ्या ‘खाऊ गल्ली’तही सध्या शुकशुकाट दिसून येत आहे.

जंगली महाराज रस्त्यावर असलेले काही खाद्यपदार्थांचे स्टॉल गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद असल्याचे दिसून आले आहे. काही स्टॉलधारकांनी गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे मर्यादित पदार्थ विक्रीस ठेवले आहेत.

दुसरीकडे, विद्यार्थी आणि नोकरदारांची नेहमी वर्दळ असणाऱ्या नवी पेठ आणि सदाशिव पेठ भागातील चहाची लहान दुकानेही सिलिंडर न मिळाल्याने बंद करण्यात आली आहेत. गॅस सिलिंडरसाठी वणवण करूनही तो मिळत नसल्याने हतबल झालेल्या दुकानदारांनी चक्क दुकानाबाहेर ‘गॅस नसल्याने दुकान बंद’ असे फलक लावून संताप व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande