बीड: राडी आरोग्य उपकेंद्राची राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनासाठी निवड
बीड, 15 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील राडी आरोग्य उपकेंद्राने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) कार्यक्रमात ८५ टक्के गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावरील मानांकनासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे बीड जिल
Radi Health Sub-Center takes a big leap; Selected for National Quality Assurance Ranking!


बीड, 15 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील राडी आरोग्य उपकेंद्राने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) कार्यक्रमात ८५ टक्के गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावरील मानांकनासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा दर्जा आता जागतिक मानकांनुसार उंचावणार आहे.

उपकेंद्रातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि रुग्णांना मिळणाऱ्या ३८० सेवांचे सूक्ष्म परीक्षण या प्रक्रियेत करण्यात आले. माता व बाल आरोग्य, कुटुंब नियोजन आणि आपत्कालीन सेवांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने निवडलेल्या ११० संस्थांमध्ये राडी उपकेंद्राने मानाचे स्थान मिळवले आहे. तालुक्यातील सर्व केंद्रे या वर्षअखेरपर्यंत प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांना आता दर्जेदार आणि विश्वसनीय उपचार आपल्या गावातच उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या या मोठ्या झेपेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande