महसूल विषयक समस्या तात्काळ सोडविण्यासाठी समाधान शिबिरे प्रभावी - डॉ. गेडाम
नाशिक, 15 मार्च, (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या तत्काळ सोडवून शासनाच्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारी समाधान शिबिरे प्रभावी माध
Samadhan camps are


नाशिक, 15 मार्च, (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या तत्काळ सोडवून शासनाच्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारी समाधान शिबिरे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

सोनांबे (ता. सिन्नर) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आज आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ रामकुमार, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व नगारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान ” राबविण्यात येत आहे. यासोबतच महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत जलद व सुलभ पद्धतीने पोहोचाव्यात हा शासनाचा उद्देश आहे. समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध महसूल सेवा उपलब्ध होत असून त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यास मदत होत आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

सोनांबे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 मध्ये विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे सेवा प्रदान करण्यात आल्याया समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या त्यांच्या परिसरातच सोडविण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील खालील तालुके व महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

• इगतपुरी – टाके बुद्रुक • कळवण – मोकभणगी • चांदवड – दुगांव • त्र्यंबकेश्वर – हरसूल • दिंडोरी – रामशेज, उमराळे बुद्रुक • देवळा – लोहोणेर • नांदगाव – जातेगाव • नाशिक (ग्रामीण) – गिरणारे • निफाड – पालखेड, रानवड • पेठ – वखारपाडा, जोगमोडी• बागलाण – विरगाव , डांगसौंदाणे • मालेगाव (ग्रामीण) – सौंदाणे • येवला – राजापूर, नगरसूल • सिन्नर – सोनांबे • सुरगाणा – सावरदरा • अप्पर नाशिक – देवळाली (विहितगाव) • अप्पर मालेगाव – उर्दूघर

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande