बीडच्या बर्दापूर पोलिसांनी सायगाव शिवारात चंदनचोरांना पकडले रंगेहात
बीड, 15 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव शिवारात चंदनाचे झाड चोरून तोडणाऱ्या दोन चोरांना बर्दापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सायगाव ते दैठणा रोडवरील एका शेतात करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना
बीडच्या बर्दापूर पोलिसांनी सायगाव शिवारात चंदनचोरांना पकडले रंगेहात


बीड, 15 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव शिवारात चंदनाचे झाड चोरून तोडणाऱ्या दोन चोरांना बर्दापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सायगाव ते दैठणा रोडवरील एका शेतात करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले आणि त्यांच्या पथकाने सय्यद अहमदअली मुब्बशीर हाश्मी यांच्या शेतात धाड टाकली असता आरोपी चंदनाचे झाड तोडताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोटारसायकल आणि दोन कुऱ्हाडी जप्त केल्या आहेत. पोलीस अंमलदार कोंडीबा म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शरद कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande