
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : घरबसल्या संस्कृत शिकण्याची उत्तम संधी संस्कृतभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपापल्या आवडीनुसार १ माध्यमभाषांपैकी एका माध्यमभाषेतून संस्कृत शिकता येऊ शकेल. संस्कृतीभारतीतर्फे संस्कृतप्रेमींसाठी 'पत्रद्वारासंस्कृतम्' या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रकिया सुरू केली आहे.
मुंबई आणि उपनगरे, कोकण आणि गोव्यात राहणाऱ्या लोकांसाठी संस्कृतीभारती कोकण प्रांतातर्फे निःशुल्क ऑनलाइन वर्ग घेतले जातील. हा ४ स्तरीय अभ्यासक्रम असून दर ६ महिन्यांनंतर घरबसल्या परीक्षा, उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रमाणपत्र दिले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समाविष्ट IKS(भारतीय ज्ञानपरम्परा) अभ्यासक्रमास पूरक अभ्यासक्रम शिकविला जाईल. चारही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भगवद्गीता व इतर ग्रंथांचा अभ्यास करणे शक्य होईल.
नावनोंदणीसाठी कृपया संस्कृतीभारतीच्या वेबसाइटला https://konkan.samskritabharati.in/ या पत्त्यावर भेट द्यावी. नावनोंदणीची प्रकिया जाणून घेण्यासाठी खालील video पहावा.
https://youtu.be/w8xlIEm5fIE?si=yIHwxtWAyq-qYbj3
इच्छुक व्यक्तींनी व्यक्तींनी खालील ग्रूपमध्ये प्रवेश करावा.
https://chat.whatsapp.com/J4t5D1muyK73wiad6iCKqr?mode=gi_t
sbk.patradwara.reg@gmail.com या ईमेलवरही संपर्क साधता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी