शांतिनिकेतन विद्यालय म्हणजे गुणवत्तांची खाण : संजय बनसोडे
लातूर, 15 मार्च (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेले विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक साधने व अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य विद्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला अध
संजय बनसोडे


लातूर, 15 मार्च (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेले विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक साधने व अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य विद्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला अधिक बळ मिळणार असून त्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणे सोपे होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम या विद्यालयातून होत आहे. आज पर्यंत हजारो विद्यार्थी या शाळेने घडवले आहेत शांतिनिकेतन विद्यालय म्हणजे गुणवत्तांची खाण असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते कोदळी ता.उदगीर येथील शांतीनिकेतन विद्यालयाच्या शैक्षणिक साहित्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी उपसभापती रामराव बिरादार येणकीकर, जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, सभापती विठ्ठल चव्हाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, पं.स. सदस्य धनराज नादरगे, सुरेश पंदिलवार, प्रा.श्याम डावळे, कोदळीच्या सरपंच गेंदाबाई कांबळे, लहु कांबळे, उपसरपंच पुंडलिक जाधव, मुख्याध्यापिका बिरादार, आशितोष पाटील गोजेगावकर, राहुल कांबळे, शुभम केंद्रे, लक्ष्मण कुंडगीर, धनंजय गुडसुरकर, गोपाळ पाटील, विपुल सुडे, निशीकांत कोठारे, बालाजी पाटील, केंद्रप्रमुख अविनाश भोसले,विजय गबाळे,विठ्ठल पाटील, प्राचार्य संजय चन्नावार, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी या संस्थेची स्थापणा १९७२ ची आहे. ही जुनी संस्था असुन ग्रामीण भागातील विद्यार्थी घडले पाहिजेत या हेतूने या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत घडवल्याने. शिक्षणाच्या जोरावरच ते कुटुंबे श्रीमंत झाली आहेत. आजपर्तंय मी अनेक जि.प.च्या शाळांना भेटी देवुन त्यांच्या अडचणी सोडवल्या असुन अनेक शाळांना संगणक दिले असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.

शांतीनिकेतन विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शैक्षणिक साहित्याचे उद्घाटन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande