प्रस्ताव दिल्यास शिवाजी विद्यापीठात कलेचे उच्च शिक्षण : प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
कोल्हापूर, 15 मार्च (हिं.स.)। कलेचे उच्च शिक्षण कोल्हापुरातच मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. कला परंपरा जपणाऱ्या कॉलेजनी तसें प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाकडे दिले तर सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव य
'गुरुशिष्य' कला प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. ज्योती जाधव


कोल्हापूर, 15 मार्च (हिं.स.)। कलेचे उच्च शिक्षण कोल्हापुरातच मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. कला परंपरा जपणाऱ्या कॉलेजनी तसें प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाकडे दिले तर सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी दिली.

गुरुवर्य टी. के. वडणगेकर यांच्या 26 व्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित 'गुरुशिष्य' कला प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन कला दालनात झालेल्या या कार्यक्रमांस आर्किटेक्ट गजेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांनी प्रदर्शनास भेट दिली.

प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, कलाकार आहेत म्हणून समाज आहे. कोल्हापूरला कलेची मोठी परंपरा आहे. आता बदलत्या काळाबरोबर कला शिक्षणही व्यापक झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना सुविधा नाहीं म्हणून अन्य शहरात शिकायला जायला लागू नये असे मला वाटते. इथे मोठी परंपरा असणारी महाविद्यालये आहेत, त्यांनी पदवी, पदव्युतर शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रस्ताव द्या, त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करून लवकरात लवकर अभ्यासक्रम कसे सुरु करता येतील ते पाहू, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी चित्रकार दुर्गा आजगांवकर यांना के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रदर्शनात विजय टिपुगडे, अजेय दळवी,विलास बकरे, संतोष पोवार,मनोज दरेकर, बबन माने, नागेश हंकारे, अभिजीत कांबळे, प्रवीण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, पूनम राऊत, शुभम चेचर, दुर्गा आजगांवकर, विजय उपाध्ये, राज इंचनाळकर, पुष्कराज मेस्त्री, सुदर्शन वंडकर, सर्वेश देवरुखकर, शैलेश राऊत, भाऊसो पाटील, रमजान मुल्ला, शुभम कुंभार, ज्ञानेश पोवार, प्रकाश मोहिते, राहुल रेपे, आरिफ तांबोळी, अनंत भोगटे, अजय ढवळे, ओंकार राऊत, देवयानी देवरुखकर, विवेक कवाळे, शशांक घाटगे यांच्या कलाकृतीचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande