
बीड, 15 मार्च (हिं.स.)।गेवराई येथील निवासी वसतिगृहात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हॉस्टेल चालक याने अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित विद्यार्थी हा मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर यांचा मुलगा असून, त्याने ४० हजार रुपयांपैकी ३९ हजार रुपये फी भरली होती. केवळ एक हजार रुपये थकबाकी राहिल्याच्या शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला हाताने व बुक्यांनी बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पाठीवर व मानेवर गंभीर वळ उठले आहेत. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि जुवेनाइल जस्टिस अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार डोळस पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis