
छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर पन्नासावा नाट्यमहोत्सव विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये संपन्न झाला. प्रादर्शिक कला विभागाचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष होता. त्यामुळे ऐतिहासिक क्षण म्हणून महोत्सवाचे स्वरूप होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर उपस्थित होते. या पन्नासाव्या नाट्य महोत्सवाला परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉ. किशोर शिरसाठ यांची उपस्थिती होती. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी विभागाची परंपरा आणि महत्व लक्षात आणून दिली. एवढ्या मोठ्या संख्येने नाट्य महोत्सव करणारा हा एकमेव विभाग आहे, असेही त्या म्हणाल्या. सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून एम. पी. ए .तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदरील नाट्यमहोत्सवास प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. आपले मनोगत प्रस्तुत करताना डॉ .अमृतकर सर यांनी विभागातील माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची कलेविषयी परंपरा विशद केली .
बारा नाटकांची मेजवानी या नाट्य महोत्सवा अंतर्गत प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षकांनी भरभरून या नाट्य महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहनही विभागाच्या वतीने करण्यात आले. पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभानंतर हिरण्यकश्यपू , लेखक सतीश बोरा यांनी लिहिलेले आणि हेमा धामुने यांनी दिग्दर्शित केलेले नाटक सादर झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis