सोलापूर झेडपी लेखा संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद जाधव
सोलापूर, 15 मार्च (हिं.स.)जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत लेखाधिकारी हरिष मेहेत्रस, सहाय्यक लेखा अधिकारी अनंता माने, संजय पाटील व रफिक मुल्ला यां
सोलापूर झेडपी लेखा संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद जाधव


सोलापूर, 15 मार्च (हिं.स.)जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत लेखाधिकारी हरिष मेहेत्रस, सहाय्यक लेखा अधिकारी अनंता माने, संजय पाटील व रफिक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणीची निवड करण्यात अली.

कार्याध्यक्ष म्हणून डी.आर.डी.ए. येथील सहाय्यक लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी आणि सचिव म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक लेखा अधिकारी प्रकाश शेंडगे, तसेच खजिनदार म्हणून बांधकाम विभाग क्र. २ चे वरिष्ठ सहाय्यक लेखा श्री. मंगेश शिंदे यांची निवड करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचलन अमित सरगर यांनी केले. प्रस्तावना उमाकांत राजगुरू यांनी मांडली. मावळते अध्यक्ष अनिल बिराजदार यांनी नवीन कार्यकरणींस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande