स्मार्ट सिटीचे काम समाधानकारक नाही : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त
पिंपरी, 15 मार्च (हिं.स.)‘स्मार्ट सिटीचे कामकाज समाधानकारक पद्धतीने झाले नाही. प्रकल्पाची पुरेशा क्षमतेने अंमलबजावणी झाली नाही, याची खंत आहे. संपूर्ण शहरासाठी काही प्रकल्प होते. काही प्रकल्प पूर्णत्वाकडे आहेत. अनेक पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत.
PCMC


पिंपरी, 15 मार्च (हिं.स.)‘स्मार्ट सिटीचे कामकाज समाधानकारक पद्धतीने झाले नाही. प्रकल्पाची पुरेशा क्षमतेने अंमलबजावणी झाली नाही, याची खंत आहे. संपूर्ण शहरासाठी काही प्रकल्प होते. काही प्रकल्प पूर्णत्वाकडे आहेत. अनेक पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत. पण, वापरात आल्या नसल्याची खंत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.

स्मार्ट सिटीच्या कामकाजाची माहिती महापालिका सभेत देतानाआयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘स्मार्ट सिटी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. स्मार्ट सिटीच्या कामाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली असून ३१ मार्चपूर्वी अहवाल मागवला आहे. भविष्यात स्मार्ट सिटी बंद झाली तरी त्यांनी राबविलेले प्रकल्प महापालिका चालविणार आहे. स्मार्ट सिटी कंपनी सुरू ठेवायची की नाही, हे महापालिका सभागृहाने ठरवायचे आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना कामावरून काढले जाईल. सल्लागार चुकला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल’. ‘स्मार्ट सिटीने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती द्यावी. चुकीची कामे करणाऱ्यांवर कारवाई व्हावी’, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande