पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन हद्दीचा नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर टोलवाटोलवी
पिंपरी, 15 मार्च (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन हद्दीचा नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर टोलवाटोलवी सुरू आहे. भूमी अभिलेख विभागाकडून रेड झोनचा अंतिम नकाशा सात महिन्यांपूर्वी महापालिकेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जानेवारीला मिळा
पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन हद्दीचा नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर टोलवाटोलवी


पिंपरी, 15 मार्च (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन हद्दीचा नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर टोलवाटोलवी सुरू आहे. भूमी अभिलेख विभागाकडून रेड झोनचा अंतिम नकाशा सात महिन्यांपूर्वी महापालिकेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जानेवारीला मिळाला आहे. मात्र, हा नकाशा महापालिका व संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी यापैकी कोणी प्रकाशित करायचा? याबाबत प्रशासकीय पातळीवर गोंधळ सुरू आहे. त्यामुळे नकाशे प्रसिद्ध कधी होणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरालगत देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी डेपोच्या बाह्रासीमा भिंतीपासून २ हजार यार्ड परिघात आणि दिधी मॅगझिन डेपोपासून १ हजार १४५ मीटर रेडझोन हद्द आहे. या भागात बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. मात्र, याभागात लाखो घरे झाली आहेत. नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत तसेच, तो अधिकृत करण्यास संरक्षण विभागाच्या अधिका-यांनी नकार दिला आहे. नकाशा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जानेवारीला सादर केला आहे. नकाशा महापालिका नाही तर, जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत, असे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande