लातूर जिल्हाधिकारी कार्यालय शिपाई पदभरतीची 'ती' जाहिरात बनावट
लातूर, 17 मार्च (हिं.स.)। सोशल मीडियावर सध्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत २९ शिपाई (महसूल सेवक) पदांच्या भरतीची जाहिरात व्हायरल झाली आहे. सदर जाहिरात पूर्णपणे फेक आहे, नागरिकांनी अशा फसव्या माहितीला बळी पडू नये आणि कोणत्याही प्रकारचे पैसे भ
खोटी जाहिरात


लातूर, 17 मार्च (हिं.स.)। सोशल मीडियावर सध्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत २९ शिपाई (महसूल सेवक) पदांच्या भरतीची जाहिरात व्हायरल झाली आहे. सदर जाहिरात पूर्णपणे फेक आहे, नागरिकांनी अशा फसव्या माहितीला बळी पडू नये आणि कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नयेत किंवा अर्ज करू नयेत.

भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी किंवा पैसे भरण्यापूर्वी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://latur.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तेथे उपलब्ध असलेल्या अधिकृत जाहिरात/जाहीरनाम्याची खात्री करा.

अफवा पसरवू नका, स्वतःची आणि इतरांची फसवणूक टाळा!

वस्तुस्थिती : लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महसूल सेवक संवर्गातील शिपाई पदासाठी परिक्षा जाहीर करण्यात आली आहे. पण ही प्रक्रिया फक्त महसूल सेवक/कोतवाल संवर्गात सलग १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आहे. खुली भरती प्रक्रिया नाही. २९ पदांची ही व्हायरल जाहिरात ही अधिकृत नसून बनावट आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande