छत्रपती संभाजी नगर अध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद सदस्य फुटण्याची भीती
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)।उद्या दिनांक 18 मार्च बुधवार रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडीसाठी बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत
छत्रपती संभाजी नगर अध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद सदस्य फुटण्याची भीती


छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)।उद्या दिनांक 18 मार्च बुधवार रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडीसाठी बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत राजकीय पेच निर्माण झाला असून अंतिम निर्णय मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यात पहिल्या टर्मचे अध्यक्षपद कोणाला मिळणार यावर अद्याप एकमत झालेले नाही. सदस्य फुटू नयेत म्हणून भाजप, शिवसेना व उद्धवसेनेने आपल्या सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. बुधवारी विशेष सभेत नामनिर्देशन व मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या चार सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असून संख्याबळाच्या राजकारणामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवड चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande