
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे मार्फत आयोजीत, औषध निरिक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा गट- ब चाळणी परीक्षा २०२५ रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळ सत्रात ११ ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हाकेंद्रावर एकूण ३६ शाळा / महाविद्यालयात ११६४० परीक्षार्थी उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आला आहे. तसेच या परीक्षेसाठी एकूण १२३४ अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.
परीक्षा केंद्रांची यादी याप्रमाणे (कंसात कक्ष व उमेदवार संख्या)-
१. न्यू हायस्कूल व कनिष्ठ- महाविद्यालय, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर हर्सूल, छत्रपती संभाजीनगर - (१३ कक्ष,३१२ उमेदवार)
२. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (सायन्य बिल्डिंग भाग-अ) रोझा बाग, हर्सूलरोड, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष, ३१२ उमेदवार)
३. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (टॉम पॅट्रीक इमारत, भाग-ब) रोझा बाग, हर्सूलरोड, छत्रपती संभाजीनगर –(२० कक्ष ४८० उमेदवार)
४. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,(उच्च शिक्षण इमारत भाग –क) रोझा बाग, हर्सूलरोड, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष २४० उमेदवार)
५. नूतन बहुउद्देशीय विद्यालय, जळगाव रोड, हडको- एन ११, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर- (८ कक्ष, १९२ उमेदवार)
६. बळीराम पाटील विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालय, एन ९, एम-२, सिडको, छत्रपती संभाजीनगर-(१३ कक्ष, ३१२ उमेदवार)
७. श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एन-८, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
८. मुकुल मंदिर हायस्कूल एन-७, सिडको पोलीस स्टेशनजवळ, सिडको, छत्रपती संभाजीनगर–(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
९. धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नाटयगृह जवळ , एन-५ सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
१०. एम.जी.एम जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय, एन-६, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(२० कक्ष,४८० उमेदवार)
११. एम.जी.एम. स्कूल ऑफ इंजि. ॲण्ड टेक्नॉलॉजी,एन-६, सेंट्रल नाक्याजवळ, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
१२. एम.जी.एम. संस्कार विदयालय एन-६ सिडको, सेंट्रल नाका छत्रपती संभाजीनगर–(१० कक्ष,२४० उमेदवार)
१३. शिव छत्रपती महाविद्यालय, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(२० कक्ष,४८० उमेदवार)
१४. संत मीरा शाळा, प्लॉट नं.-११९/बी, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
१५. व्ही.एन्न. पाटील विधी महाविद्यालय, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर-(१७ कक्ष, ४०८ उमेदवार)
१६. मराठवाडा इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) हायस्कूल व माहिती-तंत्रज्ञान (आय.टी.) महाविद्यालय, एन-४, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
१७. डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन, नवखंडा, ज्यूब्लिपार्क, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
१८. होलीक्रॉस मराठी हायस्कुल, लक्ष्मी कॉलनी, छावणी छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
१९. होलीक्रॉस इंग्रजी हायस्कुल, बंगला क्रमांक-१२, कॅन्टॉन्मेंट, नगररोड, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
२०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविदयालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
२१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविदयालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
२२. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंह वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर (१२ कक्ष,२८८ उमेदवार)
२३. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर (१२ कक्ष, २८८ उमेदवार)
२४. मिलींद विज्ञान महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
२५. मिलींद कला महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
२६. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स, (पार्ट-अ) औरंगपूरा छत्रपती संभाजीनगर –(१६ कक्ष,३८४ उमेदवार)
२७. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स, (पार्ट- ब) औरंगपूरा, छत्रपती संभाजीनगर –(१६ कक्ष,३८४ उमेदवार)
२८. श्री. सरस्वती भुवन प्रशाला,सरस्वती कॉलनी,औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
२९. शिवाजी हायस्कूल खोकडपूरा, शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
३०. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वेस्टेशनरोड,उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८उमेदवार)
३१. शासकीय तंत्र-निकेतन, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
३२. देवगीरी महाविद्यालय, (कनिष्ट महाविदयालय इमारत २ रा मजला (पार्ट-ब) रेल्वेस्टेशनरोड, उस्मानपूरा छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
३३. देवगीरी महाविद्यालय, (कनिष्ट महाविदयालय इमारत ३ रा मजला (पार्ट-सी) एम.सी. व्ही.सी विभाग रेल्वेस्टेशनरोड, उस्मानपूरा छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
३४. जी.एस.मंडळ, मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (Polytechnic), गेट नं.-३, सातारा गांव, बिड-बाय-पासरोड, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
३५. जी.एस. महाराष्ट्र इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (B. Tech), गेट नं.-५, सातारा गांव, बिड-बाय-पासरोड, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
३६. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
परिक्षार्थींसाठी सुचनाः-
१. परिक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड इत्यादी प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
२. परिक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
३. उमेदवारास त्याच्यासोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
४. सुधारीत कार्यपद्धतीनूसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास अगोदर उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन अर्धा तास अगोदर परीक्षा इमारतीचे मुख्यद्वार बंद करण्यात येणार आहे.
५. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही.
६. परिक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
७. परिक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis