
लातूर, 17 मार्च (हिं.स.): शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागात पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी उदगीर येथे शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. शिवसेना जिल्हा संघटन प्रमुख सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत उदगीर, अहमदपूर, जळकोट आणि चाकूर येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत 'गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक' हे अभियान प्रभावीपणे राबवून शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. आतापर्यंत या परिसरात १४० शिवसेना शाखांचे संघटन पूर्ण झाले असून, उर्वरित भागातही कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी एक महिन्याच्या आत सर्व रिक्त पदे भरून नवीन नियुक्त्या पूर्ण करण्यावर आणि संघटन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर यावेळी एकमताने भर देण्यात आला.
या बैठकीस जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील, अहमदपूर तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाए, चाकूर तालुकाप्रमुख खंडू वाघ, उदगीर शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, जळकोट शहरप्रमुख संजय देशमुख, नगरसेवक संजय राठोड, संदीप कुलकर्णी, लाखन कांबळे, तानाजी वडले, शंकर शेळके, प्रदीप मोर्तळे, अभंग मोहटे, मनोज पाटील, शिवाजी बिरादार, नंदू शिवशेट्टे, ॲड. श्रीनिवास मंगणाले, अविनाश राठोड, संदीप कोयले, मारुती गायकवाड, ॲड. आनंद बेळके, नारायण मिरगे, लखन घोणसे, संतोष बडगे, अविनाश बेद्रे, बाळू शिंदे, राहुल नादरगे, सचिन भोसले, विकास राठोड, जय उपाध्य, प्रताप तलवारे, अमोल वाघमारे, राहुल वाघमारे, महेश मंदाडे, अविनाश सोनकांबळे, दीपक गायकवाड, मारोती सोळुंखे, हणमंत सूर्यवंशी, संगमेय हालकुडे आणि प्रदीप पाटील लिंबगावकर यांसह लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis