नाशिक - अशोका मेडिकव्हर मध्ये अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रणाली सुरू
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)। अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकच्या सर्जिकल विभागात फोर के, थ्री डी आणि आय सी जी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित
Ashoka Medicover launches


नाशिक, 19 मार्च (हिं.स.)। अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकच्या सर्जिकल विभागात फोर के, थ्री डी आणि आय सी जी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि प्रभावी होणार असून, शरीरातील सूक्ष्म रचना स्पष्टपणे पाहणे शक्य होते.

डॉ. संदीप सबनीस यांच्या नेतृत्वाखाली ही प्रणाली कार्यरत असून, टीममध्ये डॉ. प्रखर गुप्ता आणि डॉ. उर्विक पटेल यांचा समावेश आहे. फोर के आणि थ्री डी तंत्रज्ञानामुळे अधिक स्पष्ट व त्रिमितीय दृश्य मिळते, तर आयसीजी तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान ऊतींचा रक्तपुरवठा पाहणे शक्य होते. त्यामुळे गुंतागुंत टाळण्यास मदत होते.या सुविधेमुळे पित्ताशय, अपेंडिक्स, हर्निया तसेच इतर जटिल लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येणार आहेत. मिनिमली इन्वेसिव्ह पद्धतीमुळे रुग्णांना कमी वेदना व जलद बरे होण्याचा फायदा होतो. डॉ. संदीप सबनीस यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित व परिणामकारक होत असून, नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध होत आहेत.तर अनुप त्रिपाठी यांनी रुग्णांना आधुनिक व सुरक्षित उपचार देण्यावर भर असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande