आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणा! - आमदार रणधीर सावरकर
अकोला, 19 मार्च (हिं.स.)। हिंदू सनातन धर्माच्या नवीन वर्षाच्या पर्वावर विकासासोबत एकता मानवता संस्कृती संवर्धन व पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद मध्
Photo


अकोला, 19 मार्च (हिं.स.)।

हिंदू सनातन धर्माच्या नवीन वर्षाच्या पर्वावर विकासासोबत एकता मानवता संस्कृती संवर्धन व पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा झेंडा फडकविण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आशीर्वाद द्यावा, अशी विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

गट ग्रामपंचायत घुसर-आलियाबाद येथे ग्रामपंचायत भवन उद्घाटन व लोकार्पण सोहळा गुढीपाडवा शुभ दिनी रोजी आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषद मध्ये कशा पद्धतीने वंचित आघाडीने भ्रष्टाचारांसोबत ग्रामीण व्यवस्थेमध्ये बदल घडवून न घडवता केवळ आपला विकास केला अशा तत्त्वांना दूर ठेवायची गरज असून बहुजनाच्या नावावर सत्ता स्थापित करायच्या आणि बहुजनावर अन्याय करायचा बहुजनाच्या नावाने टीका टीपी करायची व बहुजन समाजाचा नेतृत्व संपवण्याचा कुटिल दाव करणाऱ्या तत्त्वापासून सावध राहा व विकास आणि समाजसेवा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वंचित पीडित समाजाचा विकास करून संस्कृती आणि परंपरेला कायम ठेवणाऱ्या भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे रहा, असे आव्हान आमदार रणधीर सावरकर यांनी केले लोकनेते संजय भाऊ धोत्रे भाऊसाहेब फुंडकर आमदार गोवर्धन शर्मा भाऊसाहेब लहाने प्रमिलाताई टोपले भाऊसाहेब राजनकर, शंकर लालजी खंडेलवाल गोविंदराव आंधळे, डॉक्टर नागमोते सारख्या नेत्यांचा असंख्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांना गती देण्याचं काम व त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाची लोकप्रतिनिधी विकासाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण विकासाचा संकल्प करून कामाला लागल्या या कामाला आशीर्वाद द्या अशी याप्रसंगी ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande