चंद्रपूर - पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा पाया भरणी समारंभ उत्साहात
चंद्रपूर, 19 मार्च, (हिं.स.)। पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा पायाभरणी समारंभ भारतीय नववर्ष चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रसंगी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी आमदार सुधिर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगल
पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा पाया भरणी समारंभ उत्साहात ...


चंद्रपूर, 19 मार्च, (हिं.स.)। पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा पायाभरणी समारंभ भारतीय नववर्ष चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रसंगी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी आमदार सुधिर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते पायाभरणी पूजन करण्यात आले.

पत्रकार गृहनिर्माण संस्थेला प्रत्यक्ष आकार घेण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधि लागला, पण आता सदनिकांचे निर्माण कार्य दृतगतिने करुन २५ महिन्यात लाभार्थी पत्रकारांना सदनिका देण्यात येतील असा विश्वास नरेश पुगलिया यांनी व्यक्त केला.

पत्रकार गृहनिर्माण कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य मी केले भविष्यात कोणत्या ही अडचणी येणार नाहीत, असा विश्वास आहे. आवश्यक ती सर्व मदत करुन या सदनिकांसाठी शासकिय मदत प्राप्त करुन देण्याचे आश्वासन माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

समारंभाच्या प्रारंभी सुधीर मुनगंटीवार आणि नरेश पुगलिया यांचा शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष बंडू लडके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

याप्रसंगी सदनिकांचे वास्तुशिल्पज्ञ गौतम भगत यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

संजय तायडे यांनी मनोगत व्यक्त करुन सर्व सदस्यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करुन असेच सहकार्य करत राहण्याचे आवाहन केले.

मुरलीमनोहर व्यास यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष मजहर अली यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सचिव बबनराव बांगडे, कार्यकारिणी सदस्य अरुण सहाय, सुनिल तिवारी, रवि नागपुरे, पंकज मोहरीर यांनी केले.

भारतीय सनातन धर्म प्रथेनुसार विधिपूर्वक पूजन मुरलीमनोहर व्यास आणि सौ निलम व्यास यांनी केले. पं पवन व्यास यांनी पौरोहित्य कर्म करुन शास्त्रोक्त पूजन करविले.

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जेष्ठ पत्रकार श्रीधरराव बल्कि, नगरसेवक रवि लोणकर, शहरातील मान्यवर नागरिक विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, अंबिकाप्रसाद दवे, प्रमोद जयस्वाल, माजी नगरसेवक अशोक नागापूरे आणि देवेंद्र बेले आदि मान्यवरांची उपस्थिती राहिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande