
लातूर, 19 मार्च (हिं.स.)।
लातूर जिपच्या अध्यक्षा उषा पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाजपाचे नेते आ. रमेश आप्पा कराड तसेच अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी पाच वर्षांत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाचा कायापालट करून सर्वांगीण विकास घराघरांत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
मुंबई येथील या सदिच्छा भेटीप्रसंगी पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाजपाचे नेते आ. रमेश आप्पा कराड, अरविंद पाटील निलंगेकर, जिपचे गटनेते रामचंद्र तिरुके, संभाजी पाटील तळेगावकर, नगरसेवक शहाजी पाटील तळेगावकर, भरत चामले आणि कु. भक्ती तळेगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis